Vadodara Accident: बस आणि ट्रकच्या भीषण अपघात, 6 जण ठार

0

वडोदरा,दि.18: Vadodara Accident: बस आणि ट्रकच्या भीषण अपघात झाला असून यात 6 जण ठार झाले आहेत. ओव्हरटेकच्या नादात बस आणि ट्रकचा वडोदरामध्ये (Vadodara Accident) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुजरातमधील वडोदराजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून ही बस राजस्थानमधील भीलवाडा इथं जात होती. भरधाव बस वडोदराजवळ पोहोचली असता ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसच्या ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे कापला गेला आहे.

ही बस स्लीपर कोच होती. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहे. काही जखमींना सयाजी रुग्णालयात दाखल केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here