Actor Lokesh Rajendran Suicide: प्रसिद्ध अभिनेता लोकेश राजेंद्रनने केली आत्महत्या

1

दि.6: Actor Lokesh Rajendran Suicide: तमिळ टीव्ही इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. 34 वर्षीय अभिनेता लोकेश राजेंद्रन (Actor Lokesh Rajendran) याने आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी घडली, याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. ‘मर्मदेशम’ या मालिकेतून लोकेशला बालकलाकार म्हणून ओळख मिळाली. याशिवाय त्यांनी इतर अनेक मालिकांमध्ये काम केले.

गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या झालेल्या अनेक बातम्या समोर येत आहेत. सर्व सामान्यच नव्हे तर मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारांनीसुद्धा हे टोकाचं पाऊल उचलत सर्वांना धक्का दिला आहे. प्रत्येक दिवशी कोणत्या आत्महत्येची केस पाहायला मिळत आहे.

लोकेशने एक बालकलाकार इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. एक उत्तम अभिनेता-दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. या वृत्तानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लोकेश आणि पत्नीत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकेश राजेंद्रनचं लग्न झालं होतं. आणि त्याला दोन मुलेदेखील आहेत. अभिनेत्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ एका महिन्यापूर्वी त्यांना समजलं होतं की, लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काहीतरी वाद सुरु आहे.चार दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची कायदेशीर नोटीस पाठवली होती. तो या सर्व गोष्टींमुळे प्रचंड तणावात होता. आपण लोकेशला शुक्रवारी शेवटचं पाहिलं असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. त्याने आपल्याला काही पैशांची गरज असल्याचं सांगत वडिलांजवळून काही पैसे घेतले होते.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, वैवाहिक आयुष्यात सुरु असलेल्या चढ-उतारांमुळे लोकेश प्रचंड तणावात होता. यातूनच त्याला मद्यपान करण्याची सवय जडली होती. तो दररोज मद्य प्राशन करु लागला होता. त्यातच तो दररोज चेन्नई मुफस्सल टर्मिनलझोपलेला दिसून येत असे.


1 COMMENT

  1. आत्महत्या करणे हे भेकडपणाचे लक्षण आहे. आत्महत्या करणा-याला कोणीही चांगलं काम केला असे म्हणत नाहीत.
    आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पश्चात कोणाकोणाला त्रास होईल. याचा विचार एकदा करून पहायला हवा, असे मला वाटते.
    -रविंद्र जहागिरदार, सोलापूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here