नवी दिल्ली,दि.२२: २००० हजारांची नोट (2 Thousand Note) चलनातून बंद करण्याचा निर्णय RBI ने घेतला आहे. उद्यापासून म्हणजेच २३ मे पासून देशातील बँकांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पण, नोट जमा करत असताना तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. जर एखादी व्यक्ती २००० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी शाखेत आली आणि त्यांच्या काही नोटा बनावट असल्याचे आढळून आले, तर अशा परिस्थितीत बँक नोट जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. या बनावट नोटांवर आरबीआयकडून शिक्का मारला जाईल.
तर दाखल होणार गुन्हा | 2 Thousand Note
बँकेत नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या सर्व नोटा तपासूनच घेतल्या जाणार आहे. ही नोट तपासण्यासाठी मशिनचा वापर केला जाणार आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बनावट नोटांसदर्भात जारी केलेल्या नियमांचे यात पालन केले जाणार आहे. जर नोट बदलून घेत असताना बनावट नोट निघाली तर त्याला ती नोट दिली जाणार नाही, तर त्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
बनावट नोटांच्या संदर्भात आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेच्या काउंटरवर मशीनद्वारे बदलण्यासाठी ग्राहकाने दिलेल्या २००० रुपयांच्या नोटांची तपासणी करताना, यापैकी एकही बनावट असल्याचे आढळून आल्यास, बँक बनावट नोटा काढेल. चलन मुद्रांकित केले जाईल आणि ते जप्त केले जाईल. हा शिक्का मिळाल्यानंतर ही नोट एका टाकाऊ कागदासारखी होईल. अशी प्रत्येक नोट रेकॉर्डसाठी वेगळ्या रजिस्टरमध्ये टाकली जाईल. यादरम्यान, जर कोणतीही बँक ग्राहकांना अशा नोटा परत करताना आढळली, तर बनावट नोटांमध्ये बँकेचा सहभाग लक्षात घेऊन दंडही ठोठावला जाईल.
जर एका व्यक्तीकडे पाच बनावट नोटा आढळल्या तर त्या व्यक्तिविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. यासोबतच मासिक आधारावर नोंदवलेल्या अशा एफआयआरची प्रत बँकेच्या मुख्य शाखेलाही पाठवली जाईल. यामुळे बँकेत जमा करण्याअगोदर नोट तपासूनच जमा करा.
नोटेच्या पाठिमागे मंगळयान छापलेले आहे, जे आंतरग्रहीय अवकाशात देशाचे पहिले उपक्रम दर्शवते. नोटचा आकार 66mm x 166mm आहे, या नोटचे रंग भौमितिक नमुने समोर-मागे संरेखित करतात. आकड्यांमध्ये लिहिलेल्या २ हजारांसोबतच गुपचूप २ हजार रुपयांची प्रतिमाही आहे. नोटवर इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क देखील आहे. महात्मा गांधींच्या चित्राच्या उजव्या बाजूला, गव्हर्नरच्या स्वाक्षरीसह हमी कलम, वचन कलम आणि आरबीआय चिन्ह देखील आहे. महात्मा गांधींच्या फोटोसह नोटवर भारत-इंडिया लिहिलेला कलर शिफ्ट विंडो सुरक्षा धागा. ते झुकल्यावर हिरव्यापासून निळ्या रंगात बदलते.२,००० हे खाली उजवीकडे रंग बदलणाऱ्या शाईमध्ये ₹ चिन्हाने लिहिलेले आहे, वरच्या डावीकडे अंकांसह संख्या फलक देखील आहे. नोटेच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभ असून दृष्टिहीनांसाठी असलेल्या अशोक स्तंभासोबत महात्मा गांधींचा फोटोही नक्षीदार आहे.