Zee News AI Exit Poll नुसार या राज्यात भाजपाचे नुकसान

0

मुंबई,दि.2: Zee News AI Exit Poll: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. निकालापूर्वी विविध माध्यम वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपाला जास्त जागा मिळत असल्याचे दिसत आहे. झी न्यूजचा एआय एक्झिट पोल (Zee News AI Exit Poll) जाहीर झाला आहे.

झी न्यूजकडून एआय अँकर झिनीया लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अँकर ठरणार आहे.

Zee News AI Exit Poll नुसार या राज्यात भाजपाचे नुकसान

झी न्यूज एआय एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात एनडीएला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीएच्या जवळपास 8 ते 12 जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2019 मध्ये एनडीएला 64 जागा मिळाल्या होत्या. एक्झीट पोलमध्ये 52 ते 58 जगांचा अंदाज वर्तवला जात आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात एनडीच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनडीएची टॅली 28 वरुन 16 ते 22 वर घसरण्याची शक्यता आहे. तर इंडियाची टॅली 1 वरुन 8 ते 12 च्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे.

राजस्थान

राजस्थानमध्येही एनडीएला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीच्या जागा 26 वरुन 15 ते 16 च्या दरम्यान घसरण्याची शक्यता आहे. तर, इंडिया आघाडीच्या जागा ० वरुन 6 ते 10 जागांवर जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली

दिल्लीतही इंडिया आघाडी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळतील असा अदांज आहे. गेल्यावेळी इंडिया आघाडीला एकही जागा मिळाली नव्हती. भाजपच्या जागा 7 वरुन 2 ते 4 दरम्यान घटण्याची शक्यता आहे.

पंजाब

पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस वेगवेगळे लढण्याचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडिया आघाडील 3 ते 5, एनडीएला 5 ते 7 तर इतरांना 2 ते 4 जागांचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्यावेळी काँग्रेसला 8 तर एनडीएला 4 जागा मिळाल्या होत्या.

दरम्यान, न्यूज चॅनलच्या इतिहासात प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI सह एक्झिट पोल सर्वेक्षण करण्यात आले आहे. ZEE न्यूजचा पहिला AI अँकर 4 जूनपूर्वी देशातील निकाल सांगत आहे. झी न्यूजची पहिली एआय अँकर झीनिया देशातील 10 कोटी लोकांचे मत व्यक्त करणार आहे.

(Courtesy: Zee Media)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here