YS Jagan Mohan Reddy On Tirumala laddu Row: जगन मोहन रेड्डी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले…

0

मुंबई,दि.22: YS Jagan Mohan Reddy On Tirumala laddu Row: तिरुपती लाडू वाद, माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानवर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेले आरोप निराधार असल्याचा दावा रेड्डी यांनी करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. नायडू यांनी तिरुपती बालाजीचा प्रसादाबाबत धक्कादायक दावा केला होता. प्रसादात प्राण्यांची चरबी वापर केल्याचा आरोप केला होता.

गुरुवारी आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनी एक व्हिडिओ क्लिप शेअर केली ज्यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात तुपाऐवजी तिरुपती प्रसादात प्राण्यांची चरबी वापर जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात केल्याचा आरोप केला. 

काय म्हणाले जगन मोहन रेड्डी? | YS Jagan Mohan Reddy On Tirumala laddu Row

जगन रेड्डी यांनी तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांचं बेजबादार आणि राजकीय प्रेरित विधान करोडो हिंदूंच्या भावना दुखावणारं आणि जगप्रसिद्ध टीटीडीच्या (TTD) पवित्रतेला धुळीत मिळवणारं आहे असं ते म्हणाले आहेत. 

YS Jagan Mohan Reddy On Tirumala laddu Row

प्रसादम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी TTD कडे कठोर प्रक्रिया आणि गुणवत्ता तपासणी आहे यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की तूप खरेदीमध्ये ई-टेंडरिंग प्रक्रिया, एनएबीएल-प्रमाणित प्रयोगशाळा चाचण्या आणि बहु-स्तरीय तपासण्यांचा समावेश होतो. तेलुगु देसम पक्षाच्या (TDP) राजवटीतही अशीच प्रक्रिया होती, असं त्यांनी सांगितलं. 

जगन रेड्डी यांनी यावेळी खोटे आरोप TTD च्या प्रतिष्ठेला आणि भक्तांच्या विश्वासाला गंभीरपणे नुकसान पोहोचवू शकतात अशी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केलं आहे की, त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या कृतीबद्दल फटकारले पाहिजे आणि सत्य उघड करावे जेणेकरुन भक्तांचा विश्वास आणि भक्ती पुन्हा स्थापित होईल. राज्यातील नव्या सरकारला 100 दिवस पूर्ण होत असतानाच हे पत्र समोर आलं असून, याच दरम्यान चंद्राबाबू नायडू यांनी एका राजकीय सभेत ही वादग्रस्त टिप्पणी केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here