सोलापूर,दि.२४: Yavali Accident: मोहोळजवळील यावली (Yavali) गावाजवळ मालट्रक व कारच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. हे सर्व भाविक अहमदनगरहून तुळजापूरला दर्शनासाठी जात होते.
Yavali Accident: यावलीजवळ भीषण अपघात
बुधवारी पहाटे ४.३० वाजता यावली गावाजवळच्या हॉटेल सरगमसमोर पुण्याहून सोलापूरच्या दिशेने इको कार क्र. एम. एच. ४६ / ए.पी. ४१२० ही सोलापूरच्या दिशेने जात असताना, समोर जाणाऱ्या अज्ञात वाहनास धडक लागल्याने त्यात ईको कारमधील चालक आदमअली मुनावरअली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (वय ७५) कमलाबाई मारूती वेताळ (वय ६०, सर्व रा. रांजनगाव मशीद, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले व द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४० रा. रांजनगाव मशीद) ही सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मयत झाली आहे. (Yavali Accident)
तसेच ईको कारमधील बाळी बाबू पवार (वय २७), छकुली भीमा पवार (वय २७) साई योगिराज पवार (वय ७), मंदाबाई नाथा पवार (वय ५२), सुरेखा भारत मोरे (वय ४५), बायजाबाई रामदास पवार (वय ६०, सर्व रा. रांजनगाव मशीद) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. यातील एका भाविकाची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना १०८ क्रमांक ॲम्बुलन्समध्ये डॉ. रईस शेख व पायलट दिनेश निंबाळकर यांनी सोलापूरला आणले. अपघातग्रस्त कार चक्काचूर झाला होता. घटनास्थळी रक्त सांडले होते. मोहोळ पोलीस टोलनाक्याचे पेट्रोलिंग ऑफिसर मल्लिकार्जुन बजुलगे पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील रांजनगाव मशीद गावावर शोककळा पसरली आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जखमी भाविकांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती.