मुंबई,दि.२४: Eknath Khadse On Devendra Fadnavis: राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. संबंधित सर्व आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सकारला समर्थन दिल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या सत्ताबदलावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.
देवेंद्र फडणवीस हा खोटारडा माणूस | Eknath Khadse On Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस हा खोटारडा माणूस आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. देवेंद्र फडणवीसांनी काही महिन्यांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करणार नाही, म्हणजे नाही… असं रोखठोकपणे सांगितलं होतं. पण आता देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सामील करून घेतलं आहे.
या राजकीय घडामोडीवरून एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले, “भाजपाकडे १०५ आमदार आहेत आणि एकनाथ शिंदे गटाकडे ४०-४२ किंवा ५० आमदार (शिंदे गट+अपक्ष आमदार) आहेत. म्हणजेच सरकार बहुमतात आहे. असं असताना बाकीच्यांना महायुतीत नेण्याची काही आवश्यकता नव्हती. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती नाही… नाही… नाही… एकवेळ ते लग्न न करणं पसंत करतील. अविवाहित राहणं पसंत करतील. पण राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही, असं ते बोलले होते. काय खोटारडा माणूस आहे, लगेच बदलले.”