नवी दिल्ली,दि.13: तुम्ही मेट्रो, ट्रेन, पार्क किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लोकांना कानात इअरफोन घालून आजूबाजूच्या वातावरणापासून पूर्णपणे गाफील झालेले पाहिले असेल. अनेक वेळा त्यांच्या आजूबाजूला काहीतरी घडत असते पण त्याचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. हे इअरफोन्स, इअरबड्स किंवा इतर ऐकण्याच्या उपकरणांमुळे घडते, परंतु कल्पना करा की भविष्यात लोक बहिरे झाले तर काय होईल?
लोक एकत्र बसले असले तरी एकमेकांना ऐकू येत नसतील तर काय होईल? हे विचार करून तुम्हाला भीती वाटेल पण हे खरे ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या काळात जगभरात 100 कोटींहून अधिक लोक बहिरे होऊ शकतात आणि यामागे कोणतेही महामारी नसून लोकांचा एक छंद असेल.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, येत्या काळात 100 कोटींहून अधिक तरुण बहिरेपणा किंवा ऐकू न येण्याच्या समस्येशी झुंजत असतील. मेक लिसनिंग सेफ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, WHO ने इयरफोन, इयरबड किंवा हेडफोन वापरून ही समस्या टाळण्याचा सल्ला दिला आहे.
डब्ल्यूएचओच्या मेक हिअरिंग सेफ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असा अंदाज आहे की 2050 पर्यंत जगभरात 100 कोटींहून अधिक तरुण बहिरे होऊ शकतात. या तरुणांचे वयही 12 ते 35 वर्षांच्या दरम्यान असेल. आपल्या वाईट ऐकण्याच्या सवयींमुळे असे घडेल असे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात.
जर तुम्हीदेखील हेडफोन-ईअरफोनचा वापर करत असाल तर त्याच्या दुष्परिणामांचा कधी विचार केला नसेल. हेडफोन, ईअरफोन, ईअरबर्ड्स आपल्या आरोग्यावर परिणाम करत असून त्याला गोड विष म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फॅशन म्हणा किंवा आवड पण हेडफोनचा वापर येणाऱ्या पिढीला बहिरं करेल.