सोलापूर,दि.14: भाजपाच्या उमेदवारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची वंचितच्या उमेदवाराने मागणी केली आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विक्रांत गायकवाड यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. विजयकुमार देशमुख हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आमदार देशमुख यांनी खोटे शपथपत्र दाखल करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप वंचितचे गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी व शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे? ते वाचा
गायकवाड यांचे निवेदन
“सोलापूरच्या शहर उत्तरच्या विद्यमान आमदार महोदयांनी निवडणूक आयोगाचे फसवणूक करणारे खोटे शपथ पत्र सादर केल्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे मी तक्रार करत आहे की, विजय सिद्रामप्पा देशमुख हे २००४ पासून शहर उत्तर विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून निवडून येत आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या दरम्यान विजय सिद्रामप्पा देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे खोटे शपथपत्र सादर करून निवडणूक आयोगाची तसेच शहर उत्तर मधल्या सुजाण नागरिकांची कायम फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.” असे गायकवाड यांनी म्हटले आहे.
यावर्षी विधानसभा निवडणुकीसाठी शहर उत्तर मधून विद्यमान आमदार विजय देशमुख यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दिलेले शपथ पत्र पडताळून पाहिले असता आमदार महोदयांनी त्यांच्या काही महत्त्वाच्या स्थावर मिळकतींचे विवरण शपथपत्रांमध्ये नमूद केलेले दिसून आलेले नाही. यापूर्वी मागील झालेल्या निवडणुकांमध्ये देखील त्यांनी त्यांच्या काही महत्त्वाच्या मिळकती हेतू पुरस्सर शपथपत्रांमधून वगळलेल्या होत्या. यावर्षी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या मिळकती शपथपत्रांमध्ये दर्शविलेले नाहीत.
सन्माननीय आमदार विजय देशमुख यांनी यांच्या मालकीची शेळगी येथील भूमापन गटक्रमांक १४८ यांचे क्षेत्र ३५ गुंठे ही मिळकत त्याचप्रमाणे भवानी पेठ येथील ९७/२ यासि क्षेत्र ९९७९,४० चौरस मीटर, न्यू बुधवार पेठेतील टीपी स्कीम नंबर दोन २२/अ/२ असे एकूण क्षेत्र १७६९.३० चौरस मीटर, दक्षिण कसबा येथील नगर भूमापन क्रमांक ६४०/३/१ यासिक क्षेत्र ६१३.३० चौरस मीटर या मिळकती शपथपत्रांमध्ये नमूद केलेल्या नाहीत.
या जवळपास चार ते पाच मिळकती या कोट्यावधी रुपयाचे असून शपथपत्रांमध्ये या मिळकती का नमूद केल्या नाहीत किंवा या मिळकतींचा उल्लेख महोदयांनी करणे आवश्यक हाते, परंतु खोटे शपथपत्र तयार करून ते नोटरी पब्लिक यांच्या समोर साक्षांकित करून त्याचा वापर उमेदवारी नामनिर्देशन अजांसोबत ‘निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करण्यात आला व त्या त्या अर्जाच्या शपथपत्रावर हे उमेदवारी नामनिर्देशन अर्ज मंजूर करण्यात आला व आज ते उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टमधील बंधनकारक तरतुदीनुसार कोणत्याही उमेदवाराने त्याच्या सर्व व कष्टार्जत सामायिक मिळकतींचे व हिश्याचे घोषणापत्र शपथपत्रांमध्ये करणे अनिवार्य आहे. परंतु विजय सिद्रामप्पा देशमुख यांनी कोट्यावधी रुपयांच्या मिळकती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवलेले आहेत. याचा कोणत्या कारणासाठी खुलासा केलेला नाही. आमदार देशमुख यानी कोट्यावधी रुपयाच्या मिळकती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवलेले आहेत.
अद्यापही काही मिळकती ज्यांचा सुगावा लागलेला नाही, अशा मिळकती सोलापुरात असून त्याचा तपशील मिळाल्यानंतर या याबाबत स्वतंत्र तक्रार जिल्हाधिकारी महोदय व मुख्य निवडणूक आयोगाकडे मी तक्रार देत आहे. खोटी शपथपत्र दिल्यामुळे जरी हे आमदार महोदय निवडून आले तर निवडणूक निर्ण असा धिरिस्थितीमध्ये निवडणूक याचिका दाखल करण्याचे व खोट्या शपथपत्राबाबत फौजदारी दाखल करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी साहेब व निवडणूक आयोगांनी द्यावे व तसेच आमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही विनंती.
आपला विश्वासू,