औरंगजेबच्या कबरीवरून वाद, सोलापुरात विहिंप, बजरंग दलाची निदर्शने

0

सोलापूर,दि.१८: औरंगजेबची कबरीवरून सोलापूरसह महाराष्ट्रात निदर्शने करण्यात येत आहेत. औरंगजेबची कबर हटवावी यासाठी अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. अत्याचारी, दुराचारी आणि व्याभिचारी क्रूरकर्मा औरंगजेबची कबर हटवा अशी मागणी  विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केली. या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात सोमवारी (दि.१७) निदर्शने करण्यात आली. त्यानंतर या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले. 

तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी  कूरकर्मा औरंगजेबची  कबर हटवण्याचा निर्धार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबच्या कबरीला सरकारकडून विशेष पोलिस संरक्षण दिले आहे. राज्य सरकार पुरातत्व खात्याच्या आड या कबरीचे संरक्षण करीत असून त्यावर लाखो रुपये खर्ची पडत आहेत. हा खर्च  आम्हाला  मान्य नाही. सरकारने  विनाविलंब कबर काढून टाकावी अन्यथा  आम्ही ती काढू असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी विहिंपचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश बंडी, सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी यांचीही भाषणे झाली.  आंदोलनाप्रसंगी गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, जिल्हा सहमंत्री बाबूजी गिरगल, विष्णू जगताप, पुरुषोत्तम उडता, जयदेव सुरवसे, अंबादास अक्कल, संजीव चिप्पा, बसवराज सोलापुरे, अक्षय कनकुंटला, अमितकुमार गडगी, शिवकुमार पसनूर, गोपाल म्हंता, आकाश सूर्यवंशी,  नंदीनी अक्कल, आदित्य चिप्पा, प्रज्वल बासुतकर, राजेंद्र सैनी आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here