Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला आग

0

नवी दिल्ली,दि.१७: Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला आग लागल्याची घटना घडली आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातल्या विविध भागात अनेक वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांचं उद्घाटन करण्यात आलं आहे. आज (सोमवार दि.१७) सकाळी कुरवई स्थानकाजवळील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या सी-१४ डब्यातील बॅटरीला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. कोणत्याही दुखापतीची नोंद नाही. 

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला आग

सोमवारी सकाळी भोपाळ ते दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला अचानक आग लागल्याचं निदर्शनास आलं. या कोचमध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरीला ही आग लागल्याची बाब समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील रानी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज) स्थानकातून ही ट्रेन दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाल्यानंतर काही वेळाने हा प्रकार घडला.

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सी-१४ कोचमधील बॅटरीजवळ धूर निघत होता. यानंतर बॅटरी बॉक्समधून ज्वाळा निघू लागल्या. बिना रेल्वे स्थानकापूर्वी कुरवाई केथोरा येथे गाडी थांबवण्यात आली आणि प्रवासी सुखरूप उतरले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here