Urvashi Dholakia: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात

Urvashi Dholakia News: उर्वशी ढोलकियाला गंभीर दुखापत झालेली नाही

0

मुंबई,दि.5: Urvashi Dholakia Car Accident: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या (Urvashi Dholakia) कारला अपघात झाला आहे. उर्वशी नुकतीच एका अपघातातून थोडक्यात बचावली आहे. उर्वशीच्या कारचा भीषण अपघात झाला. तिच्या कारला एका स्कूल बसने धडक दिली आहे. या अपघातात अभिनेत्रीला गंभीर दुखापत झालेली नाही. पण उर्वशीच्या कारचं मात्र नुकसान झालं आहे. उर्वशी ढोलकिया ही ‘बिग बॉस 6’ची (Bigg Boss 6) विजेती आहे.

उर्वशी ढोलकियाच्या कारचा अपघात | Urvashi Dholakia Car Accident

एनआयने दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी ढोलकियाचा अपघात शनिवारी झाला आहे. एका कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी उर्वशी मुंबईतील मीरा रोड येथील एका सेटवर जात असताना हा अपघात घडला आहे. काशिमीरा भागांत एका स्कूल बसने उर्वशीच्या कारला धडक दिली आहे. या अपघातात अभिनेत्री थोडक्यात बचावली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्कूल बस असल्याने विद्यार्थ्यांचा विचार करता उर्वशीने कोणतीही कायदेशीर तक्रार नोंदवलेली नाही.

हेही वाचा Satyajeet Tambe: सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेस की भाजपाला पाठिंबा देणार?”

डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला | Urvashi Dholakia

उर्वशी ढोलकियाला गंभीर दुखापत झालेली नाही. पण डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. उर्वशीच्या अपघाताची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पण गंभीर दुखापत झाली नसल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’च्या सहाव्या पर्वाची विजेती उर्वशी ढोलकिया ठरली होती. अनेक मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यात ‘कसौटी जिंदगी की’, ‘नागिन 6’ आणि ‘चंद्रकांता’ सारख्या लोकप्रिय मालिकांचा समावेश आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या उर्वशीच्या मालिकेचा चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.

कोमोलिका हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं

उर्वशी आज एक लोकप्रिय अभिनेत्री असली तरी या प्रवासादरम्यान तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत तिने साकारलेलं कोमोलिका हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. उर्वशीने अनेक बी ग्रेड सिनेमांतदेखील काम केलं आहे. या सिनेमांतील बोल्ड सीन्स तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले नाहीत. त्यानंतर तिने बी ग्रेड सिनेमांत काम करणं सोडलं. उर्वशीने नुकतचं ‘नागिन 6’ या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या खलनायिकेची भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here