UPSC Civil Services Final Result 2021: UPSC चा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, मुलींचे वर्चस्व

0

दि.30: UPSC Civil Services Final Result 2021: UPSC ने नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. मुलींनी पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. श्रुती शर्मा अव्वल, अंकिता अग्रवाल दुसऱ्या तर गामिनी सिंगला तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. निकालात देशात श्रुती शर्मा अव्वल ठरली आहे.

यूपीएससीच्या निकालात मुलींचा वरचष्मा आहे. पहिल्या क्रमांकावर श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. यानंतर गामिनी सिंगला हिला तिसरा क्रमांक मिळाला आहे. चौथ्या क्रमांकावर ऐश्वर्या वर्मा आहे. उत्कर्ष द्विवेदी याला पाचवा क्रमांक मिळाला आहे. यक्ष चौधरी सहाव्या क्रमांकावर राहिली. आठवा रँक इशिता राठी, नववा रँक प्रीतम कुमार आणि दहावा रँक हरकिरत सिंग रंधावाला मिळाला आहे.

दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षेत भाग घेतात, त्यापैकी काही मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. आयोगाने 5 एप्रिल ते 26 मे दरम्यान मुलाखती घेतल्या होत्या.

महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. तिची ऑल इंडिया रँक 13 आहे. टॉप-15 मध्ये देसणारं हे एकमेव मराठी नाव आहे. उमेदवारांचे वैयक्तिक गुण निकालानंतर 15 दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत. आयोगाने 17 मार्च रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021 आयोजित केली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती 5 एप्रिल ते 26 मे 2022 या कालावधीत घेण्यात आल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here