केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन यांचे पती परकला प्रभाकर यांच्या विधानामुळे खळबळ

0

मुंबई,दि.8: केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन यांचे पती प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी जर भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला त देशात पुन्हा निवडणूक होणार नाही असा खळबळजनक दावा केला आहे. तिसऱ्यांदा जर एनडीए सरकार निवडून आलं तर देशाचं पूर्ण चित्रच बदलेल असं विधान परकला प्रभाकर यांनी केलं आहे. त्यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ काँग्रेसने शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ZEE24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.

तर देशात पुन्हा कधीच निवडणूक होणार नाही

मणिपूरसारखी स्थिती संपूर्ण देशात होऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.  X (एक्स) अकाऊंटवर काँग्रेसने परकला प्रभाकर यांचा मुलाखतीमधील 1 मिनिटं 49 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी पोस्टमध्ये त्यांची काही विधानांचा उल्लेख केला आहे. “2024 मध्ये जर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले, तर देशात पुन्हा कधीच निवडणूक होणार नाही. देशाचं संविधान बदलेल. मोदी स्वत: लाल किल्ल्यावरुन द्वेषयुक्त भाषण देतील. देशात लडाख मणिपूरसारखी स्थिती होईल”, असं परकला प्रभाकर म्हटल्याचं काँग्रेसने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. परकला हे अर्थतज्ज्ञ आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

हे सरकार परत आलं तर त्यानंतर निवडणूक होणार नाही

एका युट्यूब चॅनेलला परकला प्रभाकर यांनी मुलाखत दिली आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार सत्तेत आलं तर काय होईल? असं त्यांना विचारण्यात आलं. त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, “जर असं झाल्यास तुम्ही आणखी एका निवडणुकीची अपेक्षा करु शकत नाही. 2024 च्या निवडणुकीनंतर हे सरकार परत आलं तर त्यानंतर निवडणूक होणार नाही”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here