मुंबई,दि.१८: Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आव्हान दिले आहे. धर्मांतर विरोधी कायदा कर्नाटक काँग्रेस सरकारने रद्द केला आहे. नुकत्याच कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले होते. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शालेय पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवस संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि वीर सावरकर यांच्यावर आधारित धडे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भाजपकडून जोरदार विरोध होत आहे. भाजप सरकारच्या काळात हे धडे अभ्यासक्रमात टाकण्यात आले होते.
सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला. यावरून भाजप आक्रमक झाली असून, जोरदार टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सवाल केला होता. यावर आज प्रत्युत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.
सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध आम्ही करतोच | Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी तुमची परिस्थिती खूप हालाखीची आहे, तुम्ही बोलताय ते ठिक आहे. तुमचे अपमान होत आहेत. ते तुम्हाला सहन होत नाही आणि सांगताही येत नाही कारण वरुन आदेश आहे, असा टोला लगावला. सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध आम्ही करतोच. पण ज्या सावरकरांनी देश स्वतंत्र करण्यासाठी कष्ट केले. कष्ट करुन देश स्वतंत्र केला. तो देश आता ज्याचा स्वातंत्र्य संग्रामात कोणताही काडीचा संबंध नव्हता ती लोक आता देश आपल्या जोखडाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे, जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर तुम्ही तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा, हिंमत असेलतर करुन दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिले.
तर ती मस्ती मनीपुरमध्ये दाखवा | Uddhav Thackeray
“तुमची सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर ती मस्ती मनीपुरमध्ये दाखवा. तिकडे ईडी, सीबीआयचे लोक पाठवा. अमित शहांना सुद्धा लोक जुमानत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मनीपुरमध्ये जायला तयार नाहीत पण अमेरिकेत जायला तयार आहेत. पीएम मोदींनी एकदा मनीपुरमध्ये जाऊनच दाखवावं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ठाण्यात महिला गुंड तयार झालेत. महिला नेत्यांवर हल्ले केले जातात. आता इथून पुढे असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. शिवसेने पुढील हे आव्हान पहिलं नाही, याअगोदरही अशी आव्हान आम्ही पाहिले आहेत. उद्या शिवसेना वर्धापन दिन आहे आणि परवा गद्दार दिन आहे, असा टोलाही ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला.