Ajit Pawar On Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, अजित पवार म्हणाले…

0

मुंबई,दि.१८: Ajit Pawar On Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या कृत्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर शिवप्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar On Prakash Ambedkar) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar On Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच ते बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातले आहेत. एखाद्या व्यक्तीने त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून काय करावं? हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण असं कुणी केलं तर शिवप्रेमींना आवडत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

असं कुणी केलं तर ते शिवप्रेमींना आवडत नाही | Ajit Pawar

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन फुलं वाहिल्याच्या कृतीविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले, “प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातले आहेत. तसेच ते माजी खासदार व वंचित आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून काय करावं? हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. लोकशाहीत संविधानाने हा अधिकार दिला आहे. पण असं कुणी केलं तर ते शिवप्रेमींना आवडत नाही. शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तेव्हा औरंगजेबाने महाराजांना त्रास दिला होता. इतिहासात ज्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांना ती कृती योग्य वाटत नाही.

“उद्या तुम्ही पत्रकार म्हणून औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पाहणी केली. तर आम्ही त्याला विरोध करू शकत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर तिथे का गेले होते? त्यांच्या मनात काय आहे? हे प्रकाश आंबेडकरच जास्त अधिकारवाणीने सांगू शकतात. याबद्दल प्रकाश आंबेडकर जोपर्यंत स्पष्ट मत व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत आम्हाला त्याबद्दल कळणार नाही. मीही काल संभाजीनगर परिसरात होतो. तेव्हा तिथे दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती, परंतु सायंकाळी ही घटना घडल्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. या गोष्टीमुळे शिवप्रेमी नाराज झाले आहेत,” असंही अजित पवार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here