Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कुर्डुवाडी रोडवर भीषण अपघात 2 ठार 10 जखमी झाले आहेत
सोलापूर,दि.12 : बार्शी-कुर्डुवाडी रोडवर (Barshi Kurduwadi Road) ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात झाला आहे. यामध्ये 2 ठार तर 10 जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे 4 च्या वाजताच्या सुमारास घडला आहे. या अपघातामध्ये बसच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Discrict) बार्शी-कुर्डुवाडी रोडवर तिरकस पुलाजवल ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सिद्धार्थ अनिल शिंदे (ट्रॅव्हल चालक वय 27 रा. वसवडी जि.लातूर), मनोज शिवाजी विद्याधर (रा. बोधनगर लातूर) अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत.
पुणे येथून लातूरला जाण्यासाठी खासगी बस प्रवासी घेऊन निघाली होती. यावेळी ट्रॅक्टर ऊसाच्या दोन ट्रॉली घेऊन नांदणी या गावाकडून विठ्ठल शुगर कार्पोरेशन या साखर कारखान्याकडे जात होता. दरम्यान दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये खासगी बसचा चालक सिद्धार्थ शिंदे व त्याचे शेजारी बसलेले मनोज विद्याधर यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅक्टर चालक औदुंबर कोंढारे याच्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील जखमींची नावे
रहमतअलि सादिकअलि सय्यद (वय 29), वसंत तुकाराम पाडोळे (वय 65), विठ्ठल नामदेव पांचाळ (वय 91), नेहा विजय सावळे(वय 52), पार्वती बाबूराव बचुटे(वय 49), अश्विनी राहूल कदम(वय 26), मनिषा बाळासाहेब नलावडे(वय 27), पुजा ज्ञानेश्वर बारोले(वय 38), कालिदास निरु चव्हाण(वय 26 सर्व रा.लातूर) विजया किसन पांचाळ (वय 47 रा.पुणे), हेमचंद्र दौलत मोरे(वय 40 रा.बारामती), दत्ता रवन कांबळे(वय 28 रा.बाभळगांव ता.कळंब) अशी जखमींची नावे आहेत.