मुंबई,दि.7: तृणमूल काँग्रेस (TMC) नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेस नेते सत्येन चौधरी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. बहारामपूरच्या चलटियामध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक दुचाकीवरून आले आणि त्यांनी टीएमसी नेत्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर सत्येन चौधरी यांना मुर्शिदाबादला नेण्यात आले.
सत्येन हे एकेकाळी अधीर रंजन चौधरी यांच्या जवळचे होते, पण नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अलीकडे सत्येन यांचे सत्ताधारी पक्षापासूनचे अंतर लक्षणीयरीत्या वाढले होते. रविवारी दुपारी, हल्लेखोरांनी त्यांना जवळून गोळ्या घालून ठार केले.
सत्येन चौधरी हे जिल्हा सरचिटणीस होते. चौधरी यांच्यावर हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. गोळी झाडल्यानंतर त्यांना तातडीने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.