सोलापूर शहराला उद्या पाणीपुरवठा उशिरा कमी वेळ व कमी दाबाने होणार

0

सोलापूर,दि.२२: सोलापूर शहराला उद्या पाणीपुरवठा उशिरा कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे. सोलापूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी हेड वर्क्स पंप हाऊस महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून होणारा विद्युत पुरवठा वादळ वाऱ्यामुळे व पावसामुळे दि.२१.०९.२०२३ रोजी दु. ४.०० वाजता पासून खंडीत झालेला होता.

सोलापूर शहराला उद्या पाणीपुरवठा उशिरा कमी वेळ व कमी दाबाने होणार

तसेच उजनी येथील पंप गृहास होणारा विद्युत पुरवठा दि.२१.०९.२०२३ रोजी संध्या ५.०० वाजता पासून खंडीत झालेला होता. उपरोक्त दोन्ही पंपगृहास होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने शहर पाणी पुरवठा करीता टाकळी हेड वर्क्स व उजनी हेड वर्क्स येथून पुरेशा प्रमाणात पाण्याचा उपसा होऊ शकला नाही.

उपरोक्त कारणामुळे सोलापूर शहराचा शुक्रवार दि. २२.०९.२०२३ रोजीचा पाणी पुरवठा उशिरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे. असे सोलापूर महानगरपालिकेने काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

तरी नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here