सोलापूर,दि.22: Manohar Sapate On Mahesh Kothe: मनोहर सपाटे यांनी महेश कोठे यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमहापौर मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांच्या आमदारकीसंदर्भात वक्तव्य केले आहे. एका खाजगी कार्यक्रमात महेश कोठे यांनी “शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून यंदा मी निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून मला उमेदवारी मिळणार आहे. या मतदार संघातून माझी तयारी चालू झाली आहे. त्यामुळे मला आशीर्वाद द्या, यंदा मी राष्ट्रवादी पक्षाचा शहर उत्तरचा आमदार होणार” असे वक्तव्य केले होते.
मनोहर सपाटे यांचे महेश कोठे यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य | Manohar Sapate On Mahesh Kothe
यावर राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी कोठेंच्या भाषणाचा धागा पकडत राष्ट्रवादी पक्षाकडून शहर उत्तरमधून मी देखील इच्छुक आहे. जर तुम्हाला (कोठे) उमेदवारी मिळाली तर त्यांना आमदार करण्यासाठी जिवाचे रान करण्याची ग्वाही देवून सपाटेंनी राजकीय वैर संपवले. गवळी वस्ती तालीम संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आली होती.
काय म्हणाले महेश कोठे?
गवळी यांना शुभेच्छा देत असताना महेश कोठे आपल्या भाषणात राजकीय विषय छेडला. मी अनेक पक्ष फिरलो आहे. आता राष्ट्रवादी पक्षात आहे. शरद पवार हाच माझा शेवटचा पक्ष आहे. पवारांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे. निवडणुकीची तयारी मी करत आहे. त्यामुळे मला आशीर्वाद द्या, असे असे सांगत गवळींना शुभेच्छा दिल्या.
तुम्हाला आमदार होऊ द्यायचे नव्हते…
महेश कोठे यांच्या भाषणाचा धागा पकडत मी देखील शहर मतदारसंघातून सपाटे यांनी मी उत्तर विधानसभा इच्छुक आहे. राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी करणार आहे. या यापूर्वी आपल्यामध्ये राजकीय वैर होते. मी तुमच्या वाटेतील काटा होतो. त्यामुळे शहर उत्तर विधानसभा मतदार संघात आपल्याला पाडण्यासाठी लढवली होती. त्यामध्ये त्यावेळी यशस्वी झालो. मी त्या मतदारसंघात लढलो नसतो तर आपण त्याच वेळी आमदार झाला असता मात्र मला तुम्हाला आमदार होऊ द्यायचे नव्हते. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. आपल्यातील राजकीय वैर शरद पवार यांच्या साक्षीने संपले आहे. त्यामुळे आता मी तुमच्या वाटेतील काटा नाही.
आम्ही दोघे आता मित्र आहोत. एकमेकांतील राजकीय वैर संपले आहे. शरद पवार यांच्यामुळे महेश कोठे आयटी पार्क उभारत आहेत. या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. शहराचा कायापालट होणार आहे. त्यामुळे राजकीय सत्ता हाती असल्याने हे करणे शक्य आहे. त्यामुळे कोठें आमदार झालेच पाहिजे असे सांगत. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मी इच्छुक असलो तरी कोठे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास कोठे यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करेन मात्र यंदा शहर उत्तरमधून राष्ट्रवादीचा आमदार झालाच पाहिचे, असे सांगत मनोहर सपाटे यांनी कोठेचा मार्ग मोकळा करून दिला असल्याची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी होत होती.