“Tiger Is Back, आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री…”

0

पुणे,दि.5: शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार हे सहभागी झाल्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा आधूनमधून सुरुच असते. विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार असल्याचे दावे केले जातात. त्या दाव्यांना काहीच अर्थ नसल्याचे भाजप आणि शिंदे गटाकडून वारंवार स्पष्ट केले जाते.

या सर्व प्रकरणात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकवले जातात. आता पुन्हा “Tiger Is Back, आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री…” असे बॅनर झळकले आहे. पालकमंत्रीपदाचे वाटप झाल्यानंतर हे बॅनर झळकले आहेत.

“टायगर इज बॅक आजचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री”, असे बॅनर आता पुण्यात झळकले आहेत. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात हे बॅनर आहेत. “आजचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री”, अशा आशयाचे पोस्टर पुणे शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाकडून लावण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी हे बॅनर लावले आहे. त्यानंतर या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

चंद्रकांत पाटील यांना डच्चू देत अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री करण्यात आले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळत नसल्यामुळे अजित पवार नाराज होते. चंद्रकांत पाटील आणि अजित पवार या दोन दादांच्या भांडणात अजित पवार वरचढ ठरले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करु, पण आता नाही. आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवार समर्थकांमध्ये २०२४ नंतर अजित पवार मुख्यमंत्री असतील, असे बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here