नवी दिल्ली,दि.५: गुरुवारी (५ ऑक्टोबर) दिल्लीत आयोजित पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नोटीस बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटात निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरु आहे. अशातच दोन्ही गटाच्या नेत्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाने राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीत पक्षाची आगामी भूमिका मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरीनंतर पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार गटावर सडकून टीका केली. तसेच तालकटोरा येथील पक्षाच्या बैठकीचा आणि निवडणुकाचा उल्लेख करत अनेक सवाल उपस्थित केले. यावेळी शरद पवारांनी तालकटोरा येथील बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ७० जणांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव देत स्वाक्षऱ्या केल्याचंही सांगितलं. ते गुरुवारी (५ ऑक्टोबर) दिल्लीत आयोजित पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत बोलत होते.
काय म्हणाले शरद पवार? | Sharad Pawar
शरद पवार म्हणाले, की यापूर्वी अशी परिस्थिती अनेक राजकीय पक्षांकडे आली आहे. जे आम्हाला सोडून गेले आहे त्यांनी म्हंटले आहे. राष्ट्रवादी आम्हाला मिळेल असा दावा करीत आहे अजून सूनावणी सुरू झाली नाही. मी हे समझु शकत नाही, हे असे कसे होवू शकते? जे लोक सोडून गेले आहे ते म्हणतात याला काही तरी आधार आहे पण चिंता करण्याची गरज नाही. यापूर्वी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले होते. निवडणूक चिन्ह हा महत्वाचा आधार आहे. आता मतदार यापर्यंत पोहचले आहे की निवडणूक निशाणी बदलली की मतदार आपला विचार बदलतात.
काँग्रेसमध्ये वाद झाला होता त्यावेळी दोन गट झाले होते. त्यावेळी चरखा मिळाला होता तरी आम्हीं जिकलो. निवडणूक निशाणी बदल्यानी काही लोकांचा कट होवू शकतो. चिंता करण्याची गरज नाही देशाचा वातावरण बदलत आहे. गोवामध्ये भाजप नव्हती ती आमदारांना खरेदी करून आली. महाराष्ट्रात कट करून भाजप सत्तेवर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर कट करून आली. अनेक राज्यात भाजप नाही. भाजपला दूर ठेवण्याचा कल जनतेचा आहे.
आज मोदींच्या हातात सत्ता आहे. इमानदार नेते असले तर जनता सोबत राहते. भाजप इमानदार नाही त्यामुळे जनता त्यांना नाकारेल. मणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी जाण्याची गरज होती. पण त्यांनी तसे केले नाही, अशा अनेक गोष्टी सांगू शकतो.
संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदीच्या विरोधात लिहाले तर त्यांना 8 महिने तुरुंगात ठेवले. कोर्टाने त्यांना जामीन दिला. राजकीय पक्षाच्या नेत्यांना सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून तुरुंगात टाकणे हे जनतेला आवडले नाही. आता राजकीय पक्षाच्या विरोधात कारवाई करण्याचा विचार भाजपचा आहे. जुन्या काळात शासकीय कार्यक्रमात जाताना राजकीय बोलत नव्हते. पण आताचे पंतप्रधान जातात तर फक्त विरोधी पक्षाच्या विरोधात बोलतात. राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्ट आहे असे पंतप्रधान म्हणतात. ज्यांच्या विरोधात आरोप केले जाते त्यांना चार दिवसात मंत्री बनविले.