या ग्राहकांना होणार फायदा, LPG गॅस सिलेंडरच्या दरात 135 रुपयांची कपात

0

दि.1: LPG गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात 135 रुपयांची कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कंपनीने नवीन दर जाहीर केले आहेत.

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी असलेल्या 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. याआधी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 19 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती.

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीचे दर

19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत 2354 ऐवजी 2219 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 2306 ऐवजी 2171.50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 2454 ऐवजी 2322 रुपयांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार आहे. चेन्नईमध्ये 2507 ऐवजी 2373 रुपयांना उपलब्ध होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here