राष्ट्रवादी अजित पवार गटाने मंत्रीपदाची अॅाफर नाकारली

0

सोलापूर,दि.9: राष्ट्रवादीने (अजित पवार गट) भाजपाने दिलेली मंत्रीपदाची अॅाफर नाकारली आहे. नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही शपथ घेणार आहेत. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संभाव्य यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक खासदारांचा समावेश आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) महाराष्ट्रात पाच जागा लढवल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी एकाच जागेवर विजयी झाली. सुनील तटकरे हे एकमात्र विजयी झाले आहेत. भाजपाकडून एक राज्यमंत्रीपदाची अॅाफर अजित पवार गटाला देण्यात आली आहे.

मात्र भाजपाकडून देण्यात आलेली राज्यमंत्रीपदाची अॅाफर अजित पवार गटाने नाकारली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद देण्याची मागणी होती. राष्ट्रवादीने एक कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली होती. त्यांना प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी राज्यमंत्रीपदाची अॅाफर नाकारल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here