मुंबई,दि.२६: The Diary Of West Bengal: आणखी एका सिनेमावरून वाद निर्माण झाला आहे. द केरळ स्टोरी (The Kerala Story) सिनेमानंतर आता पश्चिम बंगालमध्ये आता आणखी एक सिनेमावरून वाद निर्माण झाला आहे. द डायरी ऑफ वेस्ट बंगाल (The Diary Of West Bengal Movie) सिनेमाचे निर्माता आणि दिग्दर्शकांना कोलकाता पोलिसांनी नोटिस पाठवली आहे.दरम्यान याआधी या सिनेमाच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी सिनेमाच्या निर्मात्यांना ३० मे रोजी एमहर्स्ट पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं आहे.
हेही वाचा Bihar Teacher Fight Video: महिला मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
The Diary Of West Bengal: आणखी एका सिनेमावरून निर्माण झाला वाद
द डायरी ऑफ वेस्ट बंगाल सिनेमाचा ट्रेलर ७ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमध्ये दावा करण्यात आला आहे की, बंगालमधील परिस्थिती काश्मीरहून अधिक वाईट आहे. ट्रेलरमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, बंगालमध्ये हिंदू लोकांच्या हत्या आणि सामूहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ते इथून विस्थापित होत आहेत.या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, ‘संगठीत रोहिंगे आणि कट्टरपंथी बांग्लादेशी समूहाला सरकारच्या मदतीनं’ पश्चिम बंगालमध्ये स्थापित केलं जात आहे.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी
द डायरी ऑफ वेस्ट बंगाल सिनेमाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी सांगितलं की, त्यांचा सिनेमा सत्यावर आधारीत आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी याप्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची होणारी हत्या, बलात्कार आणि विस्थापित होत आहे. या सगळ्या गोष्टींचा खूप अभ्यास करत, सत्य घटनांवर आधारीत हा सिनेमा आहे.
आम्ही दीदींच्या विरोधात नाही
द डायरी ऑफ वेस्ट बंगालमध्ये ट्रेलरमध्ये एक महिला दिसत आहे तिची वेशभूषा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी मिळती जुळती आहे. हिंदूविरोधी घटना या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात सिनेमाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी सांगितलं की, ‘या एफआयआरच्या माध्यमातून मला त्रास दिला जात आहे. मी जर एकदा तरी पश्चिम बंगालमध्ये गेलो तर तिथून परत येणार नाही. मी सिनेमासाठी सर्वप्रकारची तयारी केली आहे आणि लवकरच सिनेमा प्रदर्शित देखील करीनं. येत्या ऑगस्टपर्यंत सिनेमा प्रदर्शित करण्याचा विचार आहे. मी काहीही झालं तरी सिनेमा प्रदर्शित करणारच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोण्याचं स्वातंत्र्य मला देखील आहे.’ शर्मा पुढे म्हणाले की, मी दीदींच्याविरोधात नाही. मी व्यवस्थेच्या विरोधात आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल हे भारताचं नवीन काश्मीर आहे. मला कोलकाता पोलिसांन मेलवर समन्स पाठवलं आहे.