मुंबई वगळता पालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारने घेतला हा निर्णय

0

मुंबई,दि.22 : महाराष्ट्रातील 18 महापालिका एक सदस्यीय वार्ड पद्धत जाहीर करण्यात आली होती. पण आता मुंबई (mumbai) वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तीनचा प्रभाग करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.

मिनी विधानसभा म्हणून ओळखलेल्या जाणाऱ्या 2017 च्या मनपा निवडणुकीत पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपुरात भाजपची एकहाती सत्ता आली होती. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच विद्यमान सरकारने कायद्यात बदल करून पुन्हा एक सदस्यीय वार्ड पद्धती आणली. खुद्द अजित पवार यांनीच पुढाकार घेऊन प्रभाग पद्धती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

आज झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुंबई महानगर पालिका वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तीनचा प्रभाग करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या दबावापुढे अजित पवारांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण वरचढ ठरले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here