मुंबई,दि.६: Sunny Deol Video: अभिनेता सनी देओलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओल (sunny deol) याचा ‘गदर 2’ हा सिनेमा अलिकडेच रिलीज झाला. ‘गदर’ या गाजलेल्या सिनेमानंतर तब्बल २२ वर्षानंतर त्याचा दुसरा पार्ट रिलीज झाला त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. इतकंच नाही तर या सिनेमानंतर सनीला चांगलीच लॉटरी लागली आहे. त्याच्याकडे एकापाठोपाठ एक सिनेमांच्या रांगा लागल्या आहेत. यामध्येच सध्या सोशल मीडियावर सनीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो दारुच्या नशेत रस्त्यावर चालताना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर सनीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो मुंबईतील जुहू सर्कल येथे रस्त्यावर चालताना दिसत आहे. मात्र, त्याच्या चालण्यावरुन तो दारुच्या नशेत असल्याचं म्हटलं जात आहे. दारुच्या नशेत सनीला नीट चालताही येत नसल्यामुळे तो एका रिक्षाला धडकतो. ज्यानंतर रिक्षावाला त्याला रिक्षात बसवतो असं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
सनी खरोखर मद्यधुंद अवस्थेत आहे?
सनीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं आहे. तर, काहींच्या मते, सनीने खरोखर दारू प्यायली नसून तो फक्त त्याच्या आगामी सिनेमाचा भाग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता नेमकी किती हे सांगणं अशक्य आहे.