सोलापूर,दि.19: राज्य उत्पादन शुल्क विभागातील आरोपींना लाच प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोलापूर, राज्य उत्पन्न विभागातील निरीक्षक संभाजी फडतरे व अंमलदार प्रियांका कुटे व सिद्धाराम बिराजदार यांनी नवीन आर्थिक रजिस्टर मध्ये सही व शिक्का करून प्रमाणित रजिस्टर देण्यासाठी सोलापुरातील बार व रेस्टॉरंटचे चालक यांच्याकडे रक्कम रुपये 4000/- ची मागणी करून तडजोडीअंती रक्कम रुपये 3000/- लाचेची मागणी केली म्हणून तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत विभागाकडे आरोपी संभाजी फडतरे निरीक्षक, प्रियांका कुटे व सिद्धाराम बिराजदार अंमलदार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती.
तक्रारदाराकडून रक्कम रुपये 3000/- स्वीकारताना वरील आरोपींना त्यांच्या कार्यालयात रंगेहात पकडून अटक करण्यात आलेली होती. त्यानुसार आरोपींच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर प्रकरणात सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी आरोपी संभाजी फडतरे, प्रियांका कुटे व सिद्धाराम बिराजदार यांची प्रत्येकी रक्कम रुपये 15 हजार रुपयेच्या जामिनावर मुक्तता केली.
यात आरोपींच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओंकार परदेशी यांनी काम पाहिले.