Solapur: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

Akkalkot: महेश इंगळे यांच्या पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

0

सोलापूर,दि.२९:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी नुकतेच अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज (Shri Swami Samartha) मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. शिंदे यांनी श्री स्वामी समर्थांची आरती केली. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे (Mahesh Ingale) यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. (Akkalkot News)

वटवृक्ष मंदिरातील बदल पाहून व्यक्त केला आनंद | Akkalkot News

याप्रसंगी बोलताना शिंदे यांनी मी व माझे संपूर्ण कुटुंबीय हे असीम स्वामीभक्त आहेत. ज्या ज्या वेळी अक्कलकोटला येण्याचा प्रसंग येतो त्यावेळी शिंदे कुटुंबीय हे आवर्जून वटवृक्ष मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतात. आज अनेक दिवसानंतर स्वामी दर्शनाचा योग आल्याने व स्वामींची अत्यंत सुंदर मुर्ती पाहून आनंद झालेला आहे. येथील वटवृक्ष मंदिरातील गाभारा सुशोभीकरण, व परिसर नुतनीकरण नयनरम्य विद्युत रोषणाई इत्यादी पाहून आपल्याला अत्यंत आनंद झाला असल्याचे मनोगत व्यक्त केले व वटवृक्ष मंदिर समितीच्या व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

जाहिरात

याप्रसंगी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, अक्कलकोट काँग्रेस शहराध्यक्ष बसवराज अळ्ळोळी, सिद्धाराम भंडारकवठे, अक्कलकोट पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, मल्लीकार्जुन पाटील, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी आदींसह काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here