Solapur ST Bus Accident: सोलापूर जिल्ह्यात एसटी बसचा अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण

Solapur Accident News: वैराग माढा रोडवर मालवंडी जवळ एसटी बसचा अपघात

0

वैराग,दि.५: Solapur ST Bus Accident: सोलापूर जिल्ह्यात एसटी बसचा अपघात झाला आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. एसटीचा प्रवास सर्वात सुरक्षित प्रवास समजला जातो परंतु अलिकडे एसटीचा प्रवासही धोकादायक झाला आहे. याचा प्रत्यय वैराग जवळ नुकताच आला असून कुर्डूवाडी वैराग एसटीचा मालवंडी जवळ स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे चालकाचा ताबा सुटून एसटी घसरत जावून पलटी झाली. एसटी चालकाच्या समय सुचतेमुळे ३५ हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले असून ही घटना वैराग माढा रोडवर (Vairag Madha Road) मालवंडी जवळ गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. (Solapur Accident News)

हेही वाचा MP News: हत्याकांडातील आरोपी भाजप नेत्याचे 5 मजली हॉटेल डायनामाईटने उडवले

घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी | Solapur ST Bus Accident

या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून बहुतेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की कुर्डूवाडी आगाराची एम.एच. १४ बी.टी. ११९१ ही एसटी बस चालक दत्तात्रय शिवाजी माळी हे कुर्डुवाडीहून वैरागकडे घेऊन येत असताना मालवंडी जवळील वीज उपकेंद्राजवळ आली असता, समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीला एसटी चालकाने रस्ता दिला. दरम्यान एसटी बसचा स्टेरींग रॉडच तुटल्याने रस्ताच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला एसटी धडकून खोलगट भागात घसरत जावून पलटी झाली.

Solapur Accident News: चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण

चालकाने प्रसंगावधान राखून हॅण्डब्रेक लावल्याने एसटीचा वेग कमी होऊन पलटी झाली. या अपघातात दोन लहान मुले किरकोळ जखमी वगळता सर्वजण प्रवाशी सुरक्षित आहेत. यापूर्वी ह्याच खराब रस्त्यामुळे दोघे जण मयत झाले आहेत. यावेळी ग्रामस्थ, प्रवास करणाऱ्या वाटसरूंनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ मदतकार्य सुरू केल्यामुळे एसटीतील घाबरलेल्या प्रवाशांना मोठा आधार मिळाला. ज्या विद्युत खांबाला एसटी धडकली त्या विद्युत खांबावरून विद्युत प्रवाह सुरू नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. बार्शी तालुक्यातील अनेक मार्ग खराब झाल्याने वाहनधारकांवर प्रवास धोकादायक होत आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे अनेकांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here