Solapur: मंडल अधिकारी, तलाठी यांच्या मागण्याबाबत सकारात्मक चर्चा

Solapur: मंडल अधिकारी, तलाठी बेमुदत सामुदायिक रजा आंदोलन मागे

0

सोलापूर,दि.9: Solapur: सोलापूर जिल्ह्यातील मंडल अधिकारीतलाठी यांनी विविध मागण्यांसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत सामुदायिक रजा आंदोलन पुकारले होते. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विविध मागण्यांबाबत तसेच अडीअडचणीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

मंडल अधिकारी व तलाठी यांनी रजा आंदोलन पुकारल्याने कामे ठप्प झाली होती

सोलापूर जिल्ह्यातील मंडल अधिकारी व तलाठी यांनी विविध मागण्यांसाठी रजा आंदोलन पुकारल्याने शेतकऱ्यांची व नागरिकांची महसूल विभागाकडे असणारी कामे ठप्प झाली होती. शेतकऱ्यांना व नागरिकांना या आंदोलनामुळे अडअडचणी येवू नयेत तसेच मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विविध मागण्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, तहसिलदार महसूल, नायब तहसिलदार आस्थापना तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार आणि तलाठी संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलन मागे घेण्यात आले | Solapur

मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विविध मागण्याबाबत तसेच अडीअडचणीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाचे कामकाज दिनांक 9 फेब्रुवारी 2023 पासून आंदोलन मागे घेण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here