Solapur Corona: सोलापूर शहर व ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत वाढ

0

सोलापूर,दि.6: Solapu Corona: सोलापूर शहर व ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सोलापूर शहरातील कोरोना रुग्ण संख्येत कधी वाढ तर कधी घट होत आहे. शहरातील रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोलापूर शहर 180 अहवाल प्राप्त झाले. यात 169 निगेटिव्ह तर 11 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 2 पुरुष व 9 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही.

सोलापूर शहर व ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत वाढ | Solapur Corona

सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 36 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 15 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 34696 झाली आहे. तर यापैकी 33141 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1519 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 969 पुरुष व 550 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 106 अहवाल प्राप्त झाले, यात 99 निगेटिव्ह तर 7 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 3 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 25 झाली आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 187473 झाली आहे. तर यापैकी 183717 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3731 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2422 पुरुष व 1309 महिलांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here