सोलापूर,दि.24: सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्येत घट होत आहे. चाचण्यांची संख्याही कमी आहे. दुसऱ्या लाटेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक भागात रुग्ण संख्येने थैमान घातले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला. आता अनेकांनी लस घेतल्याने कोरोनाचा इतका प्रभाव दिसून येत नाही. लसीकरण महत्वाचे आहे, त्यामुळे सर्वांनी कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण 986 अहवाल प्राप्त झाले, यात 709 निगेटिव्ह तर 277 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 151 पुरुष व 126 महिलांचा समावेश आहे. 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3147 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 442 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 180428 झाली आहे. तर यापैकी 173589 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3692 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2398 पुरुष व 1294 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर 348 अहवाल प्राप्त झाले. यात 261 निगेटिव्ह तर 87 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 46 पुरुष व 41 महिलांचा समावेश आहे. एकही मृत्यू झाला नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2169 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 100 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 32254 झाली आहे. तर यापैकी 28606 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1479 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 943 पुरुष व 536 महिलांचा समावेश आहे.





