Home क्राइम सोलापूरच्या ‘त्या’ नगरसेविकेबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

सोलापूरच्या ‘त्या’ नगरसेविकेबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

0

सोलापूर,दि.१७: एका गंभीर गुन्ह्याखाली सध्या सोलापूर येथील तुरुंगात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नगरसेविका शालन शंकर शिंदे यांच्याबाबत न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, ज्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे.

काय होता अर्ज आणि वकिलांचा युक्तिवाद?

विधान परिषद निवडणुकीत मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी नगरसेविका शालन शिंदे यांनी अ‍ॅड. अभिजित इटकर यांच्यामार्फत न्यायालयात एक विशेष अर्ज दाखल केला होता. “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक आणि मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे तुरुंगात असले तरीही या अधिकारापासून कोणाला वंचित ठेवता येणार नाही,” असा जोरदार युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला.

न्यायालयाचा अंतिम आदेश:

बचाव पक्षाचा हा कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शालन शिंदे यांचा अर्ज मंजूर करत त्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची विशेष मुभा दिली आहे. त्यानुसार, कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना मतदान केंद्रावर हजर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे कामकाज आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अभिजित इटकर आणि अ‍ॅड. सुमित लवटे यांनी पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.