Solapur Accident: दोन ट्रक, कारमध्ये सोलापूर- अक्कलकोट महामार्गावर विचित्र अपघात; सहा जण गंभीर

सोलापूर - अक्कलकोट (Solapur Accident) महामार्गावरील कुंभारी टोलनाक्याजवळ अपघात

0

सोलापूर,दि.२७: दोन ट्रक आणि कारमध्ये झालेल्या विचित्र अपघातात (Accident) सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूरमध्ये एक विचित्र अपघात (Solapur Accident) झाला आहे. सोलापूर – अक्कलकोट महामार्गावरील कुंभारी टोलनाक्याजवळ बुधवारी सकाळी ट्रक व कारचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. वळसंग पोलिसांच्या सतर्कतेमुळे सहा जणांचे प्राण वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे.

२६ जानेवारी २०२२ रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक क्रमांक केए ३२ बी १७७७, कार क्रमांक एमएच २५ एएल ४०७०, ट्रक क्रमांक एमएच १२ सीएक्स ११७१ व ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ यांचा एकामागून एक धडक देऊन अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दासरी, वाळूनजकार, बनकर, गायकवाड, होनमोरे, मोरे, सूर्यवंशी, काळोखे हे घटनास्थळी पोहचले.

त्यानंतर पोलिसांनी क्रेनने कार व ट्रक मधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान, अपघातातील मदतीचे कार्य दोन तास सुरू होते.

अपघातातील जखमींची नावे

 – सचिन सुरेंद्र खटके (वय ३५), 

  • सपना सचिन खटके (२६)
  • परमेश्वर शिवाजी सोनटक्के (वय ४०) 
  • पल्लवी गिरिष तिवारी (वय २८)
  • तीन लहान मुले (सर्व रा .उस्मानाबाद) व 
  • ट्रक चालक गणेशन या सर्वांना सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता पाठवले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here