श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

0

सोलापूर,दि7: श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या आवारात संपन्न झाला. सुरुवातीस प्रास्ताविक केदार काशीकर यांनी केले. इयत्ता दहावीच्या सन 1995 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी समवेत त्यावेळेचे एल. केजी ते दहावी पर्यंत शिक्षकवृंद, यावेळी श्री सिध्देश्वर देवस्थान शिक्षण समिती सदस्य

संचालक डॉ. राजशेखर येळीकर, प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश गोसावी, पर्यवेक्षक शिवराज बिराजदार, माजी मुख्याध्यापिका अंजली तिवारी, एन हेमलता, नंदगिरी, अबिदा शेख, पुष्पा आटंद, सुवर्णा बिराजदार, झुंझरवाड, कामत, शेरू इच्छापुरे, कल्पना अवस्थी, उज्वला कळके, निर्मला परमशेटी, नलिनी बसुदे पाटील, सोमशेखर भोगडे, शशिकांत मोटगी, भावगी व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरूवातीला स्वागत करून सर्व विद्यार्थांच्या वतीने मान्यवरांचे आणि शिक्षकांचे यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांचे ही संस्थेच्या वतीने शिक्षण समिती सदस्य डॉ. राजशेखर येळीकर यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी अमित भाईकटी, केदार पंचे,अभयसिंह देशमुख, सुचेता कुरले पाटील, अजित कदम, वैभव पिंपळे, सादिक पठाण यांनी मनोगत व्यक्त केले.

तसेच सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे शिक्षण समिती सदस्य डॉ. राजशेखर येळीकर यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन विजया, डॉ. योगीनी सोरेगावकर पाटील आभार प्रदर्शन डॉ. नाजनीन मुजावर पेंढारी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता हुरडा पार्टी आणि सुरूची भोजनानी झाली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here