धक्कादायक व्हिडीओ महिला पोलिसांनी विद्यार्थिनीबरोबर…

0

मुंबई,दि.26: धक्कादायक व्हिडीओ तेलंगणामधून समोर आला आहे. व्हिडीओत दुचाकीवर बसलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी एका विद्यार्थीनीचे केस पकडून तिला नेत असल्याचं दिसत आहे. ही विद्यार्थिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्या असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारविरुद्ध ही तरुणी आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे.

ZEE24 ने याबाबत वृत्त दिले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, दुकाचीवर बसलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी या विद्यार्थिनीचा छळ करताना दिसत आहे. ही विद्यार्थिनी रस्त्यावरुन पळत असताना या पोलीस कर्मचारी तिच्या मागून दुचाकीवरुन येऊन तिचे केस पकडतात आणि तिला ओढत नेतात.

एबीव्हीपीकडून तेलंगणामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या एका निर्णयाविरुद्ध आंदोलन केलं जात होतं. तेलंगणा राज्य कृषी विद्यापिठाचे प्राध्यापक जयशंकर यांना नवीन हायकोर्टाचा कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याला एबीपीव्हीचा विरोध आहे. याच आंदोलनामध्ये या महिला विद्यार्थिनीबरोबर हा प्रकार घडला.

“तेलंगणा पोलिसांचा सहभाग असलेला नुकताच घडलेला प्रकार हा खरोखरच चिंताजनक आणि संतापजनक आहे,” असं बीआरएसच्या नेत्या के. कविता यांनी म्हटलं आहे. कविता या तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. “शांतते सुरु असलेल्या विद्यार्थिनींच्या आंदोलनामध्ये अशाप्रकारे एखादीला ओढत नेणं फारच चुकीचं आहे. पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या या कठोर वागणुकीबद्दल नक्कीच विचार करण्याची गरज आहे. या क्रूर वागणुकीसाठी तेलंगण पोलिसांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे,” असं कविता यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात दोषींविरोधात कारवाई करावी असंही कविता यांनी म्हटलं आहे.

या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आणि भारत राष्ट्रीय समितीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिला आणि बालविकास विभागाने तसेच मानव आधिकार कमिशनने या प्रकरणामध्ये लक्ष घालवं अशी मागणी दोन्ही विरोधी पक्षांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here