सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन विक्री रक्कम मिळावी: शिवानंद भरले

0

सोलापूर,दि.१४: जिल्ह्यातील जानेवारी २०२४ पासुन सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक केंद्रप्रमुखाचे शिल्लक राहिलेल्या पेन्शन अनुदानातून पेन्शन विक्री व उपदानाचे रकमा देण्यात यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधीकारी जंगम, शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे केली आहे.

जानेवारी पासुन सुमारे ३०० ते ४०० शिक्षक, केंद्रप्रमुख सेवानिवृत्त झाले आहेत त्यापैकी २५℅ सेवानिवृत्ताना पेन्शन विक्री व उपदानाचे रकमा देण्यात आली आहे अनुदानाच्या तरतूदी अभावी अद्याप २५० सेवानिवृत्ताना त्या रकमा मिळाले नाही. शासनाच्या वितरीत बजेट मधून जिल्ह्यात कांही अनुदान शिल्लक आहेत. एकेका सेवानिवृत्ताना २६ ते ३५ लाख रुपये देय आहे.

जिल्ह्यातील सेवानिवृत्ताना पेन्शन विक्री साठी ४० कोटी तर ग्रॅज्यूटीसाठी ३८ कोटी रक्कम लागणार आहे सेवानिवृत्त होऊन सहा महिने झाले तरी रकमा मिळते नाही प्रशासनाने या रकमा द्यावीत अन्यथा ६℅ व्याजासाठी मागणी करणार असल्याचे शिवानंद भरले यांनी म्हटले आहे या वेळी सुभाष फुलारी रमेश गायकवाड, काळप्पा सूतार, वसंतराव दिघे, सावंत गुरुजी, भिमाशंकर म्हेत्रे, आदी उपस्थित होते


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here