Home सोलापूर वार्ता संगीतामुळे जीवनाला नवी उमेद व ऊर्जा : डॉ. शिवरत्न शेटे

संगीतामुळे जीवनाला नवी उमेद व ऊर्जा : डॉ. शिवरत्न शेटे

0

सोलापूर,दि.१: “संगीत ही मनाला आनंद देणारी एक सुंदर कला आहे. ते दुःख विसरून जगण्याची नवी उमेद आणि ऊर्जा देते. संगीताच्या सुरांनी मन, मेंदू आणि शरीर प्रफुल्लित होते. आयुर्वेदानेदेखील व्यक्तीच्या आरोग्यासाठी संगीताचे महत्त्व अधोरेखित केले आहे,” असे प्रतिपादन शिव-बसव चरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.

राज फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘नवरत्न’ पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ गुणीजनांचा राज फाउंडेशनकडून सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी व्यासपीठावर मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ संरक्षण अधिकारी जोएल मेकेन्झी, लातूरचे पोलीस उपाधीक्षक चंद्रकांत माळी, पुण्यातील साहित्यिक अनिल पाटील, जिल्हा सरकारी वकील अॅड. आनंद कुर्डुकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आणि राज फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल स्वामी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष पवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपाली महामुनी, राज स्वामी, सुधा सरगुले, वैष्णवी स्वामी, अश्विनी कांबळे, आम्रपाली लोखंडे, मोहुद्दीन कोरबू आणि रोहित स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.

पुरस्कार वितरणानंतर धनश्री सरगुले, भक्ती महामुनी, चैत्राली क्षीरसागर, अनुराधा गांगल, विद्या जठार, राहुल कौलगूड, अशोक बिराजदार, भागवत जठार, विनायक सरगुले, भूषणकुमार स्वामी, सनी भंडारे, दीपक वडशेरला, शब्बीर बंडी, फारुक शेख आणि मल्लिकार्जुन सर यांच्या सुश्राव्य सुरांनी सजलेला ‘ये कहाँ आ गये हम’ हा मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

पुरस्कारार्थींची यादी:

पोलीस सेवा: पोलीस निरीक्षक अरविंद माने

वैद्यकीय सेवा: डॉ. नीलरोहित पैके

सांस्कृतिक क्षेत्र: विजय साळुंखे

नाट्य क्षेत्र: अशोक किल्लेदार

संघटन क्षेत्र: एजाज हसन शेख

गायन क्षेत्र: राजगंधर्व सदाफुले, अनुराधा गांगल, एजाज शेख

शैक्षणिक क्षेत्र: डॉ. संजय मुरूमकर


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.