भाजपाचा खासदार करणार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश?

0

जालना,दि.2: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या काळात अनेकजण पक्षांतर करतात. भाजपाचा खासदार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नेत्यांच्या पक्षांतराची मालिका सुरू आहे. अशातच भाजपला उत्तर महाराष्ट्रात एक मोठा धक्का बसण्याची शक्यता असून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

खासदार पाटील यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही भेटीसाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले होते. अशातच उन्मेश पाटील यांचा आमच्या पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून उद्या पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, “उद्या दुपारी साडेबारा वाजता जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश आहे,” अशी माहिती अंधारे यांनी दिली. तसंच ओरिजिनल शिवसेना परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत, असंही त्यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here