सोलापूर,दि.१८: प्रसिद्ध न्युरोसर्जन डॅा. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या (Shirish Valasankar Suicide) केली आहे. स्वतःवर गोळी झाडून घेत डॅा. वळसंगकर यांनी आत्महत्या केली आहे. तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. स्वतःचे चार्टर्ड प्लेन (विमान) असलेले डॉक्टर अशी त्यांची ओळख होती. Dr. Shirish Valasankar Suicide
शिरीष पद्माकर वळसंगकर यांनी 1999 मध्ये स्थापन केलेल्या न्यूरोलॉजीशी संबंधित निदान, उपचार, शस्त्रक्रिया आणि संशोधनासाठी समर्पित सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील न्यूरोलॉजिकल संस्थांमध्ये एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसचे प्रमुख स्थान आहे.
वैद्यकीय क्षेत्रात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डॅा. वळसंगकर यांनी आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून तपास सुरु आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी मोदी, सोनमाता शाळेजवळील त्यांच्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबियांनी तातडीने त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
फक्त सोलापूर नव्हे तर…
फक्त सोलापूर, महाराष्ट्रचं नाही तर जगभरात डॅा. शिरीष वळसंगकर यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊले का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केलं त्यांच्या त्याचं रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.