Sharad Pawar: कोल्हापुरातील घटनेवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा गंभीर आरोप

0

मुंबई,दि.7: Sharad Pawar On Kolhapur: कोल्हापुरातील घटनेवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गंभीर आरोप केला आहे. शिवराज्यभिषेक दिनी कोल्हापुरात (Kolhapur News) आक्षेपार्ह व्हाॅट्सॲप स्टेटस लावण्यात आल्यानंतर जातीय तणाव निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अशा प्रवृत्तींना सत्ताधारी प्रोत्साहान देतात, असा गंभीर आरोप त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना केला. दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे उदात्तीकरण होत असेल, तर खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. संगमनेरमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर कोल्हापुरातही जातीय तणाव निर्माण झाल्याने शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

शरद पवारांचा गंभीर आरोप | Sharad Pawar On Kolhapur

शरद पवार म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत आहेत. धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी प्रोत्साहित करत आहेत. कोल्हापुरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर अशांततेची परिस्थिती आहे. सत्ताधारी पक्ष दंगलीसारख्या गोष्टीला प्रोत्साहित करत आहे. शरद पवार पुढे म्हणाले की, मोबाईलवर कोणी चुकीचा मेसेज पाठवला असला, तरी त्यासाठी रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरुप देण्याची गरज नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे, पण त्यांच्याशी संलग्न लोक रस्त्यावर उतरू लागले, अहिंसेतून कटूता निर्माण झाल्यास ते बरोबर नाही. जे घडत आहे ते एकट्याचे काम नाही, त्यामागे विचारधारा आहे. अशा घटना घडतच आहेत. त्यामुळे लहान घटकांना संरक्षण देत कोणी कायदा हातात घेत असल्यास कारवाई करणे सरकारचे काम आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here