शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे पीएम नरेंद्र मोदींचा उल्लेख करत मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.17: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पीएम नरेंद्र मोदींचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही संन्यासी आहोत. राजकीय वक्तव्य करत नाही. पण राजकारण्यांनीही धर्माच्या मुद्दय़ात हस्तक्षेप करू नये, असे खडेबोल सुनावतानाच धर्मातील राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबला तर मी गॅरंटी देतो, राजकारणावर बोलणार नाही, असे परखड शब्दांत ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे जोपर्यंत पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुचींवर विराजमान होत नाही तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही, अशी खंत ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केली होती. यानंतर यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर पुन्हा एकदा शं‍कराचार्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेत स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

माध्यमांशी बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे की, राजकारणी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेत असतील, तर त्यांनी धर्माचे पालन करायला पाहिजे. धर्माचे मर्म जाणून घेऊन ते आचरणात आणणारेच खरे हिंदू असतात. धर्माचाऱ्याने वेळोवेळी धर्माची व्याख्या करणे गरजेचे आहे, अन्यथा धर्माचाऱ्याने त्याचे काम केले नाही, असे होईल. म्हणून वेळोवळी धर्माची व्याख्या करत असतो, असे शंकराचार्यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत. नरेंद्र मोदी आले त्यांनी नमस्कार केला, त्यांना आम्ही आशीर्वाद दिला. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत. त्यांच्या हिताच्या गोष्टी आम्ही सांगत आहोत. जर त्यांच्याकडून चूक झाली तर आम्ही त्यांची चूक दाखवून देतो.

पंतप्रधान मोदी यांनी मंदिरात येऊन हिंदू धर्मामध्ये हस्तक्षेप केला तर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाते आणि शंकराचार्यांनी मंदिराबाबत, धर्माबाबत काही विधान केले तर संन्यासी व्यक्तीने असे करू नये असे म्हटले जाते? राजकारण्यांनी धर्मामध्ये हस्तक्षेप करणे बंद करावे, आम्ही गॅरंटी देतो की राजकारणात हस्तक्षेप करणार नाही, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here