Shambhuraj Desai | मंत्री शंभूराज देसाई यांची शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना धमकी 

0

सोलापूर,दि.10: Shambhuraj Desai Threatens Anil Parab राजकारणाचा स्तर किती खालच्या स्तरावर जातोय याचा प्रत्यय आज आला. दिवसेंदिवस राजकीय वातावरण चांगलेच खराब होत आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना धमकी दिली आहे. विधानपरिषदेत हा प्रकार घडला. मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. 

रस्त्यावर ज्याप्रमाणे भांडणात शब्दांचा वापर केला जातो तसाच विधानपरिषदेत देखील केलेला पाहायला मिळाला. मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यात सभागृहात शाब्दिक चकमक झाली. मराठी माणसाला मुंबईत घरांसाठी आरक्षण मिळावे, यासाठी कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. 

Shambhuraj Desai Threatens Anil Parab

परब यांनी केलेल्या मागणीवरून वादाला सुरुवात झाली आणि शंभूराजे देसाई यांनी अनिल परबांना बाहेर ये तुला दाखवतो, अशी धमकी दिली. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले.

मुंबईतील प्रत्येक नवीन इमारतीत बिल्डरने ४० टक्के घरे मराठी माणसांसाठी राखीव ठेवावीत, यासाठी राज्य सरकार कायदा करणार का?” असा प्रश्न परब यांनी विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, “मुंबईत मराठी माणसाला सन्मान मिळावा, ही जशी तुमची भावना आहे तीच आमचीही भावना आहे. परंतु, २०१९ ते २०२२ या काळात तुमचे सरकार असताना हा कायदा का केला नाही? तुमच्या सरकारने मराठी माणसाकडे दुर्लक्ष केले”, असे देसाई म्हणाले. 

बाहेर ये तुला दाखवतो… | Shambhuraj Desai Threatens Anil Parab

अनिल परब म्हणाले,  “आमच्या सरकारमध्ये तुम्हीही मंत्री होता, मग तुम्ही तेव्हा काय करत होता? तुम्ही जेव्हा सरकारमध्ये होता, तेव्हा गद्दारी कशी करायची हे ठरवत होता”, असे परब म्हणाले. परब यांनी गद्दार शब्दाचा उल्लेख केल्याने शंभूराज देसाई प्रचंड संतापले. “तू गद्दार कोणाला बोलतो. तू बूट चाटत होता. बाहेर ये तुला दाखवतो”, अशी धमकी त्यांनी परब यांना दिली. यावरून सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी  सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here