Seema Haider: यूपीचे विशेष DG प्रशांत कुमार यांचे मोठे संकेत, सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवणार?

0

लखनऊ,दि.19: पबजीवरुन ओळख आणि नंतर प्रियकराला भेटण्यासाठी अवैधरित्या नेपाळमार्गे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरबाबत (Seema Haider) एक मोठी माहिती समोर आली आहे. एटीएसने सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना (Sachin Meena) यांची दोन दिवसांत सुमारे 15 तास चौकशी केली. यादरम्यान एटीएसला अनेक महत्त्वाची माहिती मिळाली.

आता सीमा हैदरविरोधातील तपास अधिक तीव्र झाला आहे. एटीएसने सीमा हैदरच्या सोशल मीडिया अकाउंटचीही चौकशी केली आहे. ज्यामध्ये दिल्ली-एनसीआरमधील बहुतांश लोक सीमाच्या सोशल मीडिया अकाउंटशी जोडलेले असल्याचे आढळून आले आहे.

Seema Haider | सीमा हैदरने…

यासोबतच सीमा हैदरने भारतीय लष्करातील काही जवानांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठवल्याची माहिती समोर आली आहे. आता तपास पथक यामागील हेतू शोधत आहे. त्याचवेळी सीमा हैदरने सांगितले की, तिच्या नावाने एक फेक प्रोफाईल तयार करण्यात आले आहे. नोएडा पोलिसांनी केलेल्या तपास अहवालाची केस फाईलही एटीएसने तपासली आहे. सध्या एटीएस प्रत्येक अँगलने तपास करत आहे.

उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, सीमा हैदरची सध्या चौकशी सुरू आहे. सर्व एजन्सी आपापले काम करत आहेत. ही बाब दोन देशांशी संबंधित आहे. पुरावे मिळेपर्यंत काहीही बोलणे योग्य नाही. 

यूपीचे विशेष डीजी प्रशांत कुमार यांचे मोठे संकेत

विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, सीमाला बाहेर (पाकिस्तानला) पाठवणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. यासाठी आधीच कायदा आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल. हद्दपार करणार की नाही, हे एजन्सी बघतील. सुरक्षेत कुठेही कसूर झाला नाही. नेपाळची सीमा खुली आहे. तसेच सीमा हैदर या एजंट आहेत का, असा प्रश्न डीजींना विचारला असता ते म्हणाले की, कोणाच्याही चेहऱ्यावर ते पाकिस्तानी असल्याचे लिहिलेले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here