सोलापूर,दि.19: RTO Solapur: समृध्दी महामार्गावर घडलेल्याा घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहनांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खाजगी बस तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. दिनांक 01 ते 18 जुलै 2023 या कालावधीत 1 हजार 355 खाजगी प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. यामध्ये 289 खाजगी प्रवासी बस दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली असून 9 लाख 52 हजार 968 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड (Archana Gaikwad) यांनी दिली.
RTO Solapur कार्यालयाकडून तपासणी मोहीम
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिनांक 01 ते 31 जुलै 2023 या कालावधीत खाजगी बस तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी पुणे सोलापूर रोड सावळेश्वर टोलानाका, लातूर-पुणे रोड बार्शी टोलनाका तसेच कोल्हापूर सोलापूर रोडवर इचगाव टोलानाका येथे वायुवेग पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सीमा तपासणी नाका, नोंदणी व सीमा तपासणी नाका, कात्राळ (मरवडे) येथे कार्यरत अधिकारी यांच्याकडून मोटारवाहन कायदयातील तरतूदींनुसार दिनांक 01 ते 18 जुलै 2023 या कालावधीत 289 खाजगी प्रवासी बस दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली.
या तपासणी मोहिमेत विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणाऱ्या 16, योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या 4, रिफलेक्टर, इंडिकेटर, टेललाईट, वायफर डॅझलिंग लाईट आदी बाबींची तपासणी करून 141 वाहनांवर बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या 01 वाहनावर, मोटार वाहन कर न भरलेल्या 03 बसेस, आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱ्या 35 बसेस, अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसणाऱ्या 117 बसेसवर प्रथोमपचार किट नसलेल्या 88, वेग नियंत्रक नसलेल्या 01, युनिफॉर्म परिधान न केलेल्या 88 बस चालकांवर, सीटबेल्ट परधिान नकेलेल्या 62 बसचालकांवर, मदयप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 01 बसचालकांवर कारवाई करून एकुण 952968 एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी खाजगी बस तपासणी मोहिम यापूढेही सुरू राहणार असून, वाहनधारकांनी वाहन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच खाजगी बसेसमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास प्रवाशांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड (Archana Gaikwad) यांनी केले आहे.