मुंबई,दि.28: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. कालच (दि.27) काँग्रेसने 14 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेने आपल्या पहिल्या यादीतच सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या मतदारसंघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसने सोलापूर दक्षिणमधून उमेदवार जाहीर ही टायपिंग मिस्टेक आहे असं मी मानतो. आमच्याकडूनही टायपिंग मिस्टेक होऊ शकते असे संजय राऊतांनी काँग्रेसला ऐकवलं. यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून आता अमर पाटील हेच उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे.