Sanjay Raut | धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी होणार; संजय राऊत यांनी सांगितले खरी शिवसेना कुणाची

Sanjay Raut News: धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार

0

मुंबई, दि.१२: Sanjay Raut: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे म्हटले आहे. धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत (Sanjay Raut News) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नसून उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं ते म्हणाले. तसेच ‘धनुष्यबाण’ निशाणी आणि ‘शिवसेना’ हे नाव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा Jitendra Awhad | राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा दिवंगत आनंद दिघे यांच्याबाबत मोठा दावा

Sanjay Raut | संजय राऊत काय म्हणाले?

“ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नाही. जिथं उद्धव ठाकरे तीच खरी शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई वाया जाणार नाही. महाराष्ट्राची जनता आयोगाच्या निर्णयाकडे बघत आहे. जरी एका बाजुने निकाल द्यायचा दबाव निवडणूक आयोगावर आहे, मात्र, तरीही धनुष्यबाण निशाणी आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचे आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू असून न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे”, असेही ते म्हणाले.

Sanjay Raut on shivsena and party symbol

शिवाजी महाराज तर प्रखर सुर्य आहेत

“समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणावेळी मुख्यमंत्री भावूक झाल्याचे बघायला मिळाले, हे सर्व ढोंग आहे. फक्त फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच उल्लेख पंतप्रधानांनी केला. पण तिथे कुठेही बाळासाहेबांचा सन्मान राखला जाईल, असे वर्तन कोणी केले नाही. यावेळी जे बॅनर लावण्यात आले होते, त्यावर चौथ्या क्रमांकावर बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आला होता. ज्या ११ ताऱ्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला, त्यातले पहिले दोन तारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे, या दोन्ही ताऱ्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न काल झाला. यापैकी शिवाजी महाराज तर प्रखर सूर्य आहेत, सूर्यावर थुंकणाऱ्यांना व्यासपीठावर बसवण्यात आले होते”, अशी टीकाही त्यांनी त्यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here