Sanjay Raut On ED Action: ईडी कारवाईवर खासदार संजय राऊत यांनी दोनच शब्दात दिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.5: Sanjay Raut On ED Action: ईडीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने संजय राऊत यांची अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरचा फ्लॅटही जप्त केला आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘असत्यमेव जयते’ एवढंच ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

“ईडी किंवा सीबीआय माझ्या मागे लागली आहे, याची मला कल्पना होती. या कारवाईचं मला आश्चर्य वाटत असेल. अशा कारवाईमुळे संजय राऊत किंवा शिवसेना खचली आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्यात तथ्य नाही. मुंबईतील राहत्या घर ईडीने जप्त केलं” असं संजय राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here