कोरोना काळातील अपंगाची कर्जे  माफ करण्याची संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

सोलापूर,दि.१६: महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळा कडून  कर्ज घेऊन अनेक अपंग  बांधवांनी उद्योग व्यवसाय चालु केले होते परंतु कोरोना महामारी मध्ये अनेक छोटे मोठे उद्योग बंद  पडल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका  बसून अपंग लोकांचे संसार उद्ध्वस्त  झाल्याने ते सदर चे कर्ज फेडण्यास असमर्थ आहेत.  त्यामुळे अपंगाचे कर्ज माफ करावे अशी मागणी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यांच्याकडे उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले सोलापूर यांच्या मार्फत निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंधःकार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणावे या उद्देश्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ डिसेंबर २००१ रोजी, जागतिक अपंग दिनाचा मुहूर्त साधून, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना केली आहे राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी विवध योजना राबविणे ही महामंडळाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अपंग वित्त विकास महामंडळ सात रस्ता आंबेडकर भवन  येथून कोव्हीडच्या अगोदर कर्ज घेऊन अनेक अपंगानी उद्योग व्यवसाय चालु केले होते
परंतु कोरोना महामारी मध्ये अनेक छोटे मोठे उद्योग बंद पडले. अनेक अपंग लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काही अपंग व्यक्तींनी आत्महत्या केल्या होत्या. काही आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत.
आता तर मुंबई हेड ऑफिसचे काही लोक व येथील स्थानिक अधिकारी  कर्जदाराच्या दारात जाऊन जोरदार वसुली करत आहेत.

त्यांचे काही एक ऐकुन न घेता सक्तीचे वसुली सुरू केले आहेत. विनंती करून सुध्दा हे कोणाचे सुध्दा एकत नसतील तर अपंग बांधव आत्महत्या  करण्याच्या विचारात आहेत ह्या आत्महत्यास शासन जबाबदार असतील, असा इशारा शहर संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, उपाध्यक्ष सीताराम बाबर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जाधव, संघटक सुलेमान पीरजादे, राजू कलमाडी, सुहास एकडे, सलीम शेख, आरिफ अत्तर ईत्यादी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here